
हाणामारी, आरोप-प्रत्यारोपांत गोंधळ; मुख्यमंत्री म्हणाले – ‘ना हनी आहे, ना ट्रॅप!’
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (१८ जुलै) शेवटचा दिवस होता. काल विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीचे पडसाद आज सभागृहात तीव्रपणे उमटले. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली, तर सरकारकडूनही तेवढ्याच तीव्र शब्दांत प्रतिउत्तर देण्यात आले.
दरम्यान, सभापती प्रा. राम शिंदे (विधानपरिषद) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पावसाळी अधिवेशन समाप्तीची घोषणा करताना सांगितले की, येत्या ८ डिसेंबर २०२५ पासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘हनीट्रॅप’ प्रकरणात काही माध्यमांतून केलेल्या अप्रत्यक्ष आरोपावर त्यांनी आज स्पष्ट उत्तर देत म्हटलं, “ना हनी आहे, ना ट्रॅप!” अशा शब्दांत त्यांनी सर्व आरोप फेटाळले.
३० जूनपासून सुरू झालेल्या या पावसाळी अधिवेशनात समाधानकारक कामकाज झाल्याची माहिती देत अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. तथापि, हाणामारी, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय चकमकींमुळे अधिवेशनाचे शेवटचे दिवस गाजले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
