सातार्‍यात लाच घेताना न्यायाधीशालाच रंगेहाथ पकडलं…

Spread the love

सातारा  | 12 डिसेंबर 2024- आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचारविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय. पीडितांना न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असते. दोन्ही बाजू ऐकण्यासाठी न्यायाधीश असतात.

खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायाधीश कोण दोषी आणि पीडित कोण याचा निर्णय देतात, मात्र चक्क लोकसेवक जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम यांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील महिला तक्रारदाराच्या वडिलांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून, त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी सत्र न्यायालय, सातारा येथे जामीन अर्ज दाखल केलेला आहे. तो जामीन अर्ज मंजूर करुन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात यांनी लोकसेवक न्यायाधीश धनंजय निकम यांच्या सांगण्याप्रमाणे व त्यांच्यासाठी तक्रारदार यांचेकडे पाच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटी करप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकणी पुढील तपास सुरु आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page