मुंबई : मुंबई-ठाण्याहून तुम्हाला नवी मुंबईत खारघर किंवा नवी मुंबई विमातळाच्या दिशेनं जाण्यासाठी आता खूप वेळ थांबाव लागणार नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे. याच दृष्टीकोनातून सिडको एक नवा प्रकल्प आणत आहे. मुंबई ठाण्याहून खारघर अवघ्या 30 मिनिटांत अंतर पार करता येणार आहे.
ठाणे, बेलापूर, पामबीच आणि शीव पनवेल या मार्गावरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी सिडको महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी खारघर तुर्भे दरम्यान लिंकरोड तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 2 हजार 195 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.
पुढील तीन वर्षात हा प्रकल्प उभा करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यामुळे आता मुंबई किंवा ठाण्याहून नवी मुंबईत येणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अवघ्या 30 मिनिटांत हे अंतर कापता येणार आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.