संगमेश्वर , दिनेश आंब्रे :- संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे आंबेकर वाडीतील ग्रामस्थांमध्ये भूस्खलनामुळे चिंतेचे वातावरण आहे.या ग्रामस्थाना दरवर्षी शासनाकडून नोटीसा येत आहेत.
मात्र त्यांनी कायम स्वरूपी कुठे राहायचे याचे नियोजन मात्र शासनाकडून होत नाहीये.
दिवसेंदिवस या कोळंबे आंबेकर वाडीतील जमीन खचत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेत असताना यावेळी सामाजिक कार्यकर्ते युयुस्तु आर्ते, विशाल रापटे,ओंकार लोध, प्रसाद सदलगे,संजय शिंदे यांनी कोळंबे आंबेकर वाडीत भेट दिली असता वाडीतील संदेश चव्हाण आणि पांडुरंग चव्हाण इतर ग्रामस्थांनी वस्तुस्थिती दाखवली व सांगितले कि दरवर्षी शासन , स्थलांतरित व्हा नोटीसा बजावते
आम्ही स्थलांतरित व्हायला तयार आहोत पण शासनच पुढाकार घ्यायला तयार नाही आमची 11घरे 26 कुटुंबे आहेत.अशा वेळी लवकरच लवकरात लवकर आमचे पुनर्वसन करा अशी कोलंबे आंबेकर वाडीतून मागणी होत आहे.