
*ठाणे:* ठाणे ते भिवंडी वडपे या रस्त्याचे काम कासवगतीने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अपघातात नागरिकांचे प्राणही जात असल्याने संतप्त झालेल्या उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली तसेच एका अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणणाले आहे.
मागिल अनेक वर्षे वडपे ते माजिवडे या आठ पदरी महामार्गाचे काम सुरु असून त्याचे अजूनही २० ते २५टक्के काम बाकी आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीचा त्रास ही नित्याची बाब झाली आहे. त्यात या रस्त्यावर अपघात होऊन चालकांचा मृत्यू देखील झाला आहे. याबाबत पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री, खासदार, आमदार यांनी भिवंडी-वडपे रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करीत, संताप व्यक्त केला. ठाणे ते भिवंडी वडपे येथील रस्ता अजून का झाला नाही? तो काय मुंबई-गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का? काम होत नसेल तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश दिले. तसेच काम करत नसाल तर तुम्हाला देखील निलंबित करीन असा इशारा देत, श्री.शिंदे यांनी तत्काळ डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले.
पनवेल ते कल्याण, ठाणे, भिवंडी व पालघर या मार्गांवरील तीव्र वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना धारेवर धरत “काम करा, नाहीतर निलंबनाची कारवाई करेन” असा इशारा दिला.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याचे काम जुन्या तंत्रज्ञानाने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर खासदार नरेश म्हस्के यांनी या रस्त्याबाबत अधिकाऱ्यांची ढिलाई बैठकीत अधोरेखित केली. दरम्यान, ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनीही एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी व एमएमआरडीए विभागांवर खापर फोडले. समृद्धी महामार्ग झाला, पण ठाणे-भिवंडी वडपे रस्ता झालेला नाही. सहा लेनवरून दोन लेनवर बॉटलनेक होतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

