उत्सवाबरोबर जपली सामाजिक बांधिलकी., दहीहंडीला अनेक मान्यवरांची हजेरी
मुंबई (शांताराम गुडेकर )
शिवसेना पुरस्कृत शिवबा मित्र मंडळ बोरिवली (प.)तर्फे भव्य दहिकला उत्सव -२०२३ थाटामाटात बोरिवली येथे पार पडला. मंडळातर्फे आयोजक श्री. सुनील पाटील(उपविभाग प्रमुख )यांनी मंडळ तर्फे श्री. दामोदर म्हात्रे तसेच श्री. सचिन दामोदर म्हात्रे(लोकसभा संपर्क प्रमुख विभाग -१ व २), श्री. नवघरे, सौ. तन्वी नवघरे, पत्रकार समीर वि. खाडिलकर(दै. झुंजार केसरी ) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंडळातील अन्य पदाधिकारी, मान्यवर मंडळी यांचाही श्री. सुनील पाटील (उपविभाग प्रमुख)यांनी सत्कार केला. या उत्सवाला मा. आमदार किरण पावसकर यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रत्येक सलामी देणाऱ्या मंडळाला आयोजकांतर्फे पारितोषिक देण्यात आले. श्री गावदेवी पथकाने शिवसेना पुरस्कृत शिवबा मित्र मंडळ आयोजित दहिकला उत्सव -२०२३ ची हंडी फोडली.या दहीहंडीला अनेक मान्यवर यांनी हजेरी लावली. मंडळ तर्फे जल्लोषी उत्सवाचे आयोजन होते. शिवाय उत्सव बरोबर सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली.
गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा… असा मुंबईसह महाराष्ट्रमध्ये जयघोष ठिकठिकाणी ऐकायला मिळत होता .त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. थरावर थर लावत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात होता.काही दहीहंडी पथकांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारही हजेरी लावताना दिसलें. बॉलिवूडमधील तसंच मराठी कलाकारही ठिकठिकाणी हजेरी उपस्थित होते.कृष्णाचा जन्म अनेक उद्देशांनी झाला होता. त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी ही देखील त्यांची एक लीला आहे. दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा मिळतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. यासाठी ते आपल्या मित्रांसोबत आजूबाजूच्या गवळणींच्या घरीही दही लोणी चोरी करत असत.कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा आणि इतरही गवळणी दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी दहीहंडीचा उत्सव खूप उत्साहात साजरा होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा जल्लोष बघायला मिळतोय.
दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. मुंबईत गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक मंडळे अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. या उत्सवात सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात आणि अनेक मोठी मंडळी या उपक्रमात सहभागी होत तरूणांना प्रोत्साहन देत उत्साह वाढवतात हे या उत्सव निमित्त बघायला मिळाले.