सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं : अन्यथा विराट मोर्चा काढणार, कुणबी समाजाचा सरकारला इशारा….

Spread the love

सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं, अन्यथा विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुणबी समाजानं दिला. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे..



मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान इथं आंदोलन केलं. आंदोलनाची धार पाहून राज्य सरकारनं 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाचा जीआर काढला. यानंतर मराठ्यांना हैद्राबाद गॅजेटप्रमाणे कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी असं जात प्रमाणपत्र दाखले देण्यास सुरुवात केली आहे. मात्र याला ओबीसी समाज तसेच कुणबी समाजाकडून मोठा विरोध होत आहे. दरम्यान, राज्य सरकारने जो मराठा आरक्षणासाठी जीआर काढला आहे, त्याला आमचा विरोध असून, ओबीसी समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले जात आहे. कुणबीतून दाखले दिले जाताहेत. त्यामुळं आमच्यावर अन्याय होत आहे. परिणामी आमच्या आरक्षणास धक्का लागणार आहे. म्हणून सरकारनं पहिल्यांदा कुणबीतून मराठ्यांना दाखले देणं बंद करावे, अन्यथा आम्ही कुणबी समाज येत्या 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुणबी समाजन्नोती संघटनेचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी दिला आहे.

कुणबीच्या माध्यमातून मराठ्यांना ओबीसीत आणले जात आहे :

2 सप्टेंबर रोजी सरकारनं मराठा आरक्षणाचा जीआर काढला. त्यानंतर आम्ही 15 सप्टेंबरला कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रके वाटली. आम्ही या आरक्षणाला विरोध करतोय अशी भूमिका मांडली होती. मराठा समाज आणि कुणबी समाज यांच्यात खूप फरक आहे. मराठा समाज हा ओबीसी समाजात येत नाही. आमचा समाज हा मागासलेला आहे. पण मराठा समाज हा आर्थिकदृष्टया सक्षम आहे. अनुसूचित जमातीचा दर्जा आम्हांस द्यावा ही आमची मागणी मोर्चात असणार आहे. मराठा आरक्षणासाठी यापूर्वी ज्या-ज्या समित्यांनी अहवाल दिला, त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण फेटाळून लावले आहे. त्यामुळं राज्य सरकारनं जो जीआर काढला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असं अध्यक्ष अनिल नवगणे यांनी म्हटलं आहे.

…अन्यथा सरकारच्या मानेवर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही :

“मराठा आंदोलकाचा धसका घेऊन राज्य सरकारनं जीआर काढला आहे. आमच्या अनेक समस्या आहेत. याचा सरकारनं विचार केला पाहिजे. मराठा समाजाला सारथी संस्थेच्या माध्यमातून अनेक सवलती आहेत. तशा सवलती आम्हास नाहीत. ओबीसींच्या 372 जाती आहेत. त्यामुळं आमच्या वाटेचे जर आरक्षण दिले तर आमच्यावर अन्याय होईल. मराठा आरक्षण रद्द करावे ही आमची प्रमुख्य मागणी आहे. आमच्या मोर्चात सर्व राज्यातील कुणबी समाज एकत्र येईल. मंडल आयोगाने जे निकष आखून दिले आहेत, यात मराठा आरक्षण बसत नाही. राजकारण्यांनी केवळ मतांसाठी मराठा आरक्षण दिले आहे. यात ओबीसी समाज भरडला जातोय,” असा आरोप संघटनेचे चिटणीस कृष्णा वणे यांनी केला. तर “यापूर्वी या कुणब्यांच्या नावाने अनेकांनी फायदा घेतला आहे. आम्हाला खड्यासारखे बाजूला केले आहे. मराठा समाज जे-जे मागेल ते दबावाखाली दिले जात आहे. मुख्यमंत्री म्हणतायेत की आमचा डिएनए ओबीसी आहे. मग तुम्ही ओबीसी समाजासाठी काय केले?,” असा सवाल यावेळी कृष्णा वणे यांनी उपस्थित केला. “आमच्या मोर्चात ज्या मागण्या आहेत, त्या मान्य झाल्या नाहीत तर आमचा लढा अधिक तीव्र होईल. आम्ही देखील सरकारच्या मानेवर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी सरकारला दिला आहे.

काय आहेत कुणबी समाजाच्या मागण्या ? :

हैद्राबाद गॅझेटीमधील नोंदी विचारात घेऊन मराठा कुणबी किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी जा जीआर आहे तो मागे घ्यावे.

मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ओबीसीमध्ये समावेश करु नये
मराठा समाज मागास नसतानासुद्धा 58 लाख कुणबी नोंदीद्वारे दिलेले बोगस जातीचे दाखले तत्काळ रद्द करावे.

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी न्या. संदिप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून, ती तत्काळ बरखास्त करावी.

2004 रोजी ओबीसीच्या यादीत ‘अ. क्र. 83 – कुणबी’ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ‘मराठा कुणबी’ व ‘कुणबी मराठा’ या पोटजातीचा शासन निर्णय रद्द करावा.

कुणबी आणि मराठा एक नाहीत यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालाची दखल घेऊन शासनाने मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देऊ नये.

EWS, SEBC आणि बोगस कुणबी नोंदीद्वारे OBC आरक्षणाचा लाभ घेताहेत. हे बोगस दाखल्यावर आळा घालण्यासाठी जातीचा दाखला आधार कार्डला लिंक करण्यात यावा.

ओबीसींचा राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधील अनुशेष ताबडतोब भरण्यात यावा- भारताची सार्वत्रिक जनगणना ही जातनिहाय झाली पाहिजे.

शामराव पेजे समिती व महाराष्ट्र राज्य कुणबी उच्चाधिकार समिती (शंकरराव म्हसकर) या दोन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी तत्काळ व्हावी.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा

आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..

“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page