
मुंबई :- १ ऑगस्ट २०२५ पासून अनेक नियम बदलणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून तसेच बँका, वाहन क्षेत्र आणि वित्तीय संस्थांकडून काही नवे नियम लागू होणार असून, यामुळे तुमच्या खिशावरचा भार आणखी वाढणार आहे. पेट्रोल, एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. तसेच UPI पेमेंटबद्दलही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
क्रेडिट कार्ड
SBIच्या क्रेडिट कार्डधाकरकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ११ ऑगस्टपासून एसबीआय अनेक को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मोफत हवाई अपघात विमा बंद करणार आहे. पीएसबी, युको बँक, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक, अलाहाबाद बँक आणि SBI काही एलिट आणि प्राइम कार्डवर १ कोटी किंवा ५० लाखांचे कव्हर देत असे, पण आता मात्र ते मिळणार नाही.

LPG गॅस दरात बदल
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी किंवा व्यावसायिक सिलेंडरच्या किमती बदलतात. त्यामुळे आताही त्यात बदल होण्याची शक्यता आहे. १ जुलै रोजी व्यावसायिक सिलेंडर ६० रुपयांनी स्वस्त झाला होता. त्यामुळे आता १ तारखेला ही किंमत बदलणार की तशीच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या घरगुती ग्राहकांना आणखी तडाखा बसण्याची शक्यता.
UPI चे नियम बदलणार
१ ऑगस्टपासून UPIचे नियम बदलत आहेत. पेटीएम, फोनपे, जीपे किंवा इतर प्लॅटफॉर्मचा वापऱ्यांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही नवीन नियम आणले आहेत. यानुसार तुम्ही तुमच्या यूपीआय ॲपवरून दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स चेक करू शकणार आहेत. तसेच ऑटोपे व्यवहार आता फक्त सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९:३० नंतर करता येणार आहे. यासह इतरही काही बदल होणार असल्याची माहिती आहे.
सीएनजी-पीएनजीच्या किमतीत बदल
सीएनजी-पीएनजीच्या किमतीतही १ तारखेला बदल होत असतो, मात्र एप्रिलपासून या किंमती स्थिर आहेत. मात्र आता त्यात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या किमती वाढल्यास सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
एटीएफच्या किमती
एअर टर्बाइन फ्युएल (विमानाचे इंधन) च्या किमतीत १ ऑगस्टपासून बदल होऊ शकतो. याच्या किमती वाढल्या तर विमानाच्या तिकीटाच्या किमती वाढू शकतात. तसेच इंधनाची किंमत कमी झाली तर विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर