चिपळूण शहरालगत धामणवणे येथील शेतामधील शेत तळयामध्ये पडलेल्या खवले मांजरास वनविभागाने दिले जीवदान

Spread the love

चिपळूण : चिपळूण शहरालगत असलेल्या धामणवणे येथील शेतामधील शेत तळयामध्ये पडलेल्या खवले मांजरास वनविभागाने जीवदान दिले आहे.धामणवणे येथील शेततळ्यामध्ये खवले मांजर पडले असल्याची माहिती राम रेडीज यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली.यानंतर शेत तळयामध्ये जावून पडलेल्या खवले मांजराची रेस्क्यु करणेसाठी वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहचून खवले मांजरास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यात घेवून खवले मांजराची पशुवैद्यकिय अधिकारी यांजकडून तपासणी करुन तेसुरक्षित असल्याची खात्रीकरून घेवून नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडून देण्यात आले.

सदरचे बचावकार्य विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली व परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती राजश्री चं. कीर, त्यांचे अधिनस्त वनरक्षक रामपूर श्री. शिंदे, वनरक्षक कोळकेवाडी राहूल गुंठे व वाहनचालक श्री नंदकुमार कदम यांनी पूर्ण केले.

मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page