सिंधुदुर्गातील समुद्रात सापडली व्हेल माशाची उलटी, बॉक्समध्ये भरुन विकायला नेली, इतक्यात….

Spread the love

सांगली: व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. तर दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल पावणे सहा कोटींच्या व्हेल माशाची उलटी पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सांगली शहरातल्या शामराव नगर जवळील एपीजे अब्दुल कॉलेज जवळ बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघात संशयितांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता,त्यांच्याजवळ व्हेल माशाची पाच किलो वजनाची उलटी आढळून आली.


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्हेलच्या उलटीच्या या साठ्याची किंमत सुमारे पाच कोटी ७१ लाख इतकी आहे. हा पदार्थ जप्त करत या प्रकरणी सांगलीत राहणाऱ्या सलीम पटेल त्याचबरोबर सिंधुदुर्गहून उलटी पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या अकबर शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे,अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. तसेच सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page