पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे  स्वागत, शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न …

Spread the love


संगमेश्वर : अर्चिता कोकाटे /नावडी- पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये  नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे सचिव श्री धनंजय शेट्ये सर यांच्या हस्ते  गुलाब पुष्प आणि शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आले.
    

तसेच विद्यार्थ्यांचे पालकही यावेळी उपस्थित होते.त्यांचेही स्वागत संस्थेचे सचिव श्री धनंजय शेट्ये सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह होता. यावर्षी 16 जून शाळेचा पहिला दिवस आणि पावसाची दमदार हजेरी संगमेश्वर तालुक्यामध्ये होती.पण इतका प्रचंड पाऊस आणि संगमेश्वर मध्ये पूरस्थिती असताना देखील इयत्ता पाचवी ते दहावीचे  नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी उत्साहाने शाळेमध्ये पहिल्या दिवशी हजर होते.


सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे सचिव शेट्ये सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री खामकर सर  आणि सर्व उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव शेट्ये सर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील उज्वल यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page