![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/03/images-38.jpeg)
गुहागर : स्वामी समर्थ या मी मराठी वाहिनीवरील स्वामींच्या केलेल्या भूमिकेमुळे आम्ही प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचलो हे खरे आहेच. शिवाय भाविक रसिकांना स्वामींच्या दर्शनाचा आनंद आणि त्यांची जीवनाविषयीचा शिकवणीचा लाभही मिळाला, यातच आम्हाला समाधान आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया स्वामींची भूमिका साकारणारे प्रफुल्ल सामंत यांनी व्यक्त केली.
गुहागर तालुका क्षत्रिय मराठा प्रिमीयर लीग आयोजित जानवळे फाटा येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेला सामंत यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मी मराठी वाहिनीवरील स्वामी समर्थांची भूमिका मी 2009 पासून साकारली आहे. स्वामींचे जीवन, त्यांचा अध्यात्मिक वारसा यांची संपूर्ण माहिती घेऊन प्रत्यक्ष भूमिका साकारण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशही मिळाले.
जवळपास 1 हजार प्रयोग होत आले आहेत. रसिकांच्या घरोघरी आम्ही पोहचलो. त्यांनाही आनंद मिळाला. या स्पर्धेच्या निमित्ताने मला येथे येण्याचा योग आला. अशाप्रकारच्या स्पर्धांमधून एक सांघिक कौशल्य पूर्ण करण्याची शिकवण खेळाडूंना मिळाली आहे. सर्व समूहाने एकत्र येऊन ही स्पर्धा यशस्वी केली आहे. ही स्पर्धा केवळ मनोरंजन नाही तर शारीरिक शिक्षण, तंदुरुस्ती,
निरोगी आरोग्यही खेळाडूंना मिळाले आहे. गुहागरला निसर्गाचे वरदान लाभले आहे. समुद्र, जंगल, वनसंपत्ती खरपूर आहे. निसर्गाने येथे भरभरुन दिले आहे तेवढेच येथील लोकांचे प्रेमही मला लाभले आहे. जेथे जातो तेथे आमचे स्वागत होते यातच सर्वही काही आले असे उद्गगार सामंत यांनी काढले.