ठाणे (प्रतिनिधी ) सुधीर घाग
पाटपन्हाळे हायस्कूल,शृंगारतळी ता. गुहागर जि रत्नागिरी या शाळे मधील (सन १९७७)इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थ्यांचे वर्गाचे आठवे स्नेह संमेलन नुकतेच मालवण तारकर्ली या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले
माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक श्री नासिम मालानी यांच्या प्रयत्नाने सन २०१८ साला पासून हे स्नेह संमेलन होत आहे.संमेलनसाठी रविंद्र चव्हाण, विभावरी मुसळे, भारती भोईर, दिनकर जांभळे यांचे विशेष सहकार्य लाभले
सकाळी काही विद्यार्थी मुंबई वरून निघून दुपारी चिपळूण येथे एकत्रित होऊन,इतर गावाकडील मित्र मैत्रीण सह रात्री मालवण तारकर्ली येथे आगमन, रविवारी मालवण किल्ला, डॉल्फिन पॉइंट , गोल्डन पॉइंट , ठिकाणी जाऊन रात्री ब्ल्यू हेवन हॉटेल मध्ये वास्तव्य . रात्र भर गप्पा गोष्टी, व मनोरंजन कार्यक्रम करून, शेवटी एकमेंका बाबतीत
मनोगत सांगून व जुन्या आठवणीना उजाळा देऊन त्या रात्रीचा कार्यक्रम संपविला. त्यासाठी शरद पवार, महेंद्र आंबेकर ,छाया, किशोर संसारे, चंद्रकात शिर्के, विनायक शिर्के, हरिभाऊ, यशवंत, आत्माराम शिंदे यांचे ही योगदान लाभले …
कार्यक्रमचा शेवट गोड करून ४७ वर्षांनी एकत्र आलेल्या काही मित्र मैत्रीण सह एकमेकाचे आभार मानले आणि सर्वांना दिर्घ आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली आणि परतीचा प्रवास सुरू झाला असेच पुन्हा पुन्हा भेटण्या साठी .