
राजापूर: तालुक्यातील रानतळे येथील पोल्ट्री फार्म जवळ कारची रस्त्यात आलेल्या गुरांना जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली. तर एक जनावर गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये चालकाने सीट बेल्ट लावल्याने सुदैवाने बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, बारसू येथील ठेकेदार दीप्तेश कदम हे यांच्या कार घेवून रानतळे असे जात होते. त्यांची गाडी येथे असलेल्या पोल्ट्री फार्म जवळ आली असता अचानक रस्त्यावर आलेल्या मोकाट गुरांमुळे कारची गुराना धडक बसली. या धडकेनंतर गाडी रस्त्याच्या बाजूला जावून उलटली. मात्र यावेळी कदम यांनी कार मधिल सीटबेल्टचा वापर केल्यामुळे सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली असून दुसरे जनावर गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. राजापुर तालुक्यात काही दिवसांपासून मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील यावर ठोस कारवाई न झाल्याने असे अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोकाट गुरांचे मालक शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*