चिरे घेऊन जाणाऱ्या डंपरचे ब्रेक अचानक फेल झाल्याने धाकोरे बानघाटीत भीषण अपघात,सुदैवाने चालक बचावला…

Spread the love

*सावंतवाडी/प्रतिनिधी:-* धाकोरे येथून वेंगुर्ल्याच्या दिशेने चिरे घेऊन जाणाऱ्या डंपरचे ब्रेक अचानक फेल झाल्याने धाकोरे बानघाटीत भीषण अपघात झाला. यात डंपर चालक सुदैवाने बचावला. तसेच डंपरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बानघाटीतील तीव्र उतारामुळे आणि डंपरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. डंपर थेट घाटीतील एका खड्ड्यात जाऊन आदळला. या धडकेत डंपरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याला कोणतीही गंभीर इजा झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page