सावर्डे: प्रतिनिधी चिपळूण तालुक्यातील दहीवली खुर्द येथील ग्रामदेवता श्री आई वरदान मानाई देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून ७ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण तालुक्यातील दहिवली खुर्द येथे श्री.आई वरदान मानाई देवीचे मंदिर आहे. फेब्रुवारी ते मार्च या २ महिन्याच्या कालावधीत चोरट्याने या मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याची मोडतोड करूनकेले. ग्रामदेवतेच्या दानपेटी उचकटून त्यातील ७ हजार रुपयांची रक्कम चोरून पोबारा केला असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या बाबत सावर्डे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.