मुंबई इंडियन्ससाठी करो या मरो असा असलेला सामना मुंबईच्या संघासाठी लकी ठरलेल्या वानखेडे स्टेडियमवर होणार…

Spread the love

प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर विजय खेचून आणावा लागेल अन्यथा स्पर्धेच्या बाहेर

वानखेडेवरील सामना रोमांचक होण्याची दाट शक्यता

मुंबई : करो या मरो सामन्यापूर्वी आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

मुंबई इंडियन्ससाठी हा करो या मरो सामना असेल. कारण जर त्यांनी हा सामान गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. कारण हा सामना जर त्यांनी गमावला तर ते १६ गुणांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. सध्याच्या घडीला मुंबईचे १४ गुण आहेत आणि आरसीबीच्या संघाचेही १४ गुण आहेत. आरसीबीला नेट रनरेट हा मुंबईपेक्षा चांगला आहे. त्यामुळे मुंबईला जर प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांच्यासाठी विजय महत्वाचा असेल.

मुंबईच्या चाहत्यांसाठी आता एक महत्वाची बातमी आली आहे. मुंबईचा हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. हा सामान वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे आणि हे मैदान मुंबईच्या संघासाठी लकी ठरले आहे. आतापर्यंत या मैदानात सहा सामने झाले आहेत आणि या सहा सामन्यांपैकी मुंबईने चार सामने जिंकले आहेत. फक्त दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईची कामगिरी वानखेडेवर चांगली झाली आहे आणि त्यांचा हा करो या मरो सामना वानखेडेवरच होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांसाठी ही एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी असणार आहे. या सामन्यात मुंबईला चाहत्यांचा जोरदार पाठिंबा मिळू शकतो आणि त्यामुळे त्यांच्या विजयाची जास्त शक्यता असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे ही मुंबईच्या संघासाठी चांगली बातमी आहे. त्यामुळे आता या लकी मैदानात मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

मुंबईच्या संघासाठी आता ही करो या मरो परिस्थिती असेल. कारण त्यांना विजयावाचून पर्याय नसेल. कारण त्यांचा हा अखेरचा सामना असेल आणि जर विजय मिळवला नाही तर ते स्पर्धेच्या बाहेर जातील. त्यामुळे त्यांना या सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page