
कोरोना फैलाव : गाफील राहू नका, आतापासूनच काळजी घ्या: तज्ज्ञांचा सल्ला
महाराष्ट्र : कोरोनाची रुग्णसंख्या माहे फेब्रुवारी २०२३ पासून राज्यात व देशात वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कोवीड रूग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व स्तरावर सतर्कता बाळगणे आणि पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. या करिता जिल्हा टास्क फोर्स सभा जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
दि.२८.०३.२०२३ रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स सभेमध्ये राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कीर्तीकिरण पूजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी हे ऑनलाईन व्ही. सी. द्वारे उपस्थित होते. सध्या रत्नागिरीमध्ये एकूण २९ कोरोना बाधीत रुग्ण आहेत, यातील मंडणगड – १, चिपळूण-७, , संगमेश्वर- ५, रत्नागिरी – ५, लांजा-१, व राजापूर-२ असे असून यापैकी ४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत तर १७ रुग्ण गृहविलागीकरणामध्ये आहेत.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पुढीललप्रमाणे मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाही करण्यातबाबत सूचित करण्यात आले. कोवीड अॅप्रोप्रिएट बिहेविअर (उदा. मास्क घालणे. सॅनिटायजरचा वापर करणे.), सामाजिक अंतर (Social distance) ठेवणे, साबण पाण्याने वरचेवर हात धुणे, लक्षणे जाणवल्यास तपासणी करून घेणे, ऑक्सिजन लेवल तपासणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यास अॅडमिट होणे, गर्दीची ठिकाणे टाळावीत, कोवीड व्हॅक्सिनचे राहिलेले डोस उपलब्ध झाल्यावर घेणेत यावे, आजार झाल्यास डॉक्टरांच्या सल्याने उपचार करण्यात यावेत
जाहिरात
