
बुलढाणा- समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील 26 जणांचा मृत्यू झाला आहे.. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला आहे.. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे..नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती.. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली.. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला होता.. बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती दिली आहे..

दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने हे ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळावर पाच ते सहा रुग्णवाहिका, सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पोहोचलेले आहेत.. बसमधील प्रवाशांचा जळून कोळसा झाल्याने मृतकांची ओळख पटवणे अवघड काम झाले आहेत.. यासंदर्भात डीएनए टेस्टच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा झाली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली..विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. 30 जून रोजी नागपुर वरून सायंकाळी 5 वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. 1 जुलै च्या रात्री 1.22 मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.
त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यात प्राथमिक अंदाजानुसार 26 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.. कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते..
फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले..ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यु झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे..