
रत्नागिरी: तालुक्यातील करबुडे येथे झाड तोडण्याचे काम करत असताना पडल्याने ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुभाष गोविंद तारवें, ( ४६ वर्षे, राहणार हातखंबा, तारवेवाडी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष तारवे हे १३ मे रोजी सकाळी करबुडे येथे झाड तोडण्यासाठी गेले होते. सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास ते झाडावरून खाली पडले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल केले आहे. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे हातखंबा परिसरात शोक पसरला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.