
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे शनिवारी सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्या मृत्यूचे गूढ कायम राहिले आहे
कामथे घाटात मध्यवर्ती ठिकाणी जात असताना सामाजिक कार्यकर्ते
समीर काझी यांना हा मृतदेह दिसून आला. याची माहिती त्यांनी तत्काळ पोलिसांना दिली. त्याचा चेहरा पूर्णपणे खराब झाल्याने त्याची ओळख स्पष्ट झालेली नाही. मृतदेहाची ओळख पटून तपासाला, दिशा मिळावी, यादृष्टीने चिपळूण पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.