दहावी बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली; महाराष्ट्र बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर…

Spread the love

दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

▪️बोर्डाच्या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय?

बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, असा अंदाज बोर्डाने वर्तवला आहे.

त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी व इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं बोर्डाने म्हटलं आहे.

🔹️उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम

▪️मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि. १८ मार्च २०२५.

🔹️प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन

▪️शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५

🔹️माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा

▪️शुकवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५

🔹️प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन

▪️सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page