
*रत्नागिरी /प्रतिनिधी-* जानेवारीपासून हॉटेलच्या मूळ मालकाने हे हॉटेल अरमान खान याला चालवण्यासाठी भाड्याने दिले होते. अरमान खान याच्याबरोबर त्याचा अजून एक मित्र असून तो आता फरारी झाल्याचे समजते. फरारी माणूस कोण याची चौकशी पोलीस करत आहेत. मुळात या सर्व अनैतिक धंद्याला पाठबळ कोणाचे आहे याचीही नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे. लवकरच चौकशीमध्ये या संदर्भात नावे पुढे येतील असे स्थिती निर्माण झाली आहे.
हॉटेलच्या लॉजचा वापर अनैतिक धंद्यांसाठी…
दरम्यान अरमान करीम खान हा कोकण नगर येथे राहत असून त्याने हे हॉटेल जानेवारीपासून मूळ मालकाकडून चालवायला घेतले होते परंतु हॉटेलचं लॉजच्या उद्देश वेगळा ठेवून याच्यात अनैतिक धंदेच मोठ्या प्रमाणावर केले जात असल्याचे समजते. दरम्यान याबाबत पोलिसांनी आता तपास सुरू केला असून रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच आजूबाजूच्या जिल्ह्यातून येथे गिऱ्हाईक घेत असल्याचे समजते. रत्नागिरीच्या आजूबाजूतील लोकांची गर्दी सदर हॉटेलमध्ये होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रत्नागिरी व लांजातील आंबटशौकीन यांची गर्दी हॉटेलवर असायची असे बोलले जात आहे. पोलीस तपासामध्ये सदरचे नावे पुढे येतील असे बोलले जात आहे.
*लॉजवर आलेल्या मुली मुंबई व इतर राज्यातून येऊन धंदा…*
ह्या मुली जानेवारीपासूनच ये जा जात होत्या तर गेल्या आठ दिवसापासून या मुली या हॉटेलमध्ये राहिल्याचे समजते यापूर्वी या हॉटेलमध्ये अजून कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून राज्यातून मुली आले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. या मुलींना आणण्यासाठी ब्रोकर कोण आहे याची चौकशी पोलीस करत आहेत. लवकरच यांची नावे समोर येते असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले.
*रत्नागिरी सारख्या शहरांमध्ये असे धंदे होत असल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह..*
रत्नागिरी सारख्या संस्कृत आणि सुशिक्षित शहरात अशा प्रकारची घटना घडत असेल तर ते दुर्दैव म्हणावेच लागेल. कारण रत्नागिरीतील आंबट शौकीन कोण कोणत्या मार्गाने जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे. सदर घटना घडल्याने पोलीस प्रशासन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. रत्नागिरी या पद्धतीचे धंदे होत असल्याने प्रशासन काय करत होते हा प्रश्न उपस्थित होते.गेली अनेक दिवस सदस्य धंदे होत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. प्रशासन काय करत होते हा प्रश्न उपस्थित होत आहे लवकरच सत्य समोर येईल असे बोलले जाते.
*हॉटेल मालकाला अंधारात ठेवून हॉटेल चालवणारे केला वेश्याव्यवसाय…*
धक्कादायक म्हणजे जानेवारीपासून त्या हॉटेलमध्ये चालत होते अनैतिक धंदे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.जानेवारीतच आरमान खान याने हे हॉटेल चालवण्यासाठी घेतले होते मूळ मालकाकडून आणि त्याच्या बरोबर अजून एक त्याचा मित्र असे दोघे मिळून हॉटेल चालवत होते. परंतु या हॉटेलमध्ये खरोखरच लोक येत होती की हायवे वर हॉटेल व्यवसायासाठी वापरले जात होते याबाबत आता शंका निर्माण केली जात आहे. चौकशीमध्ये हॉटेल मालकाने चालवायला दिल्याचे सांगितले आहे. लवकरच सत्यसमोर येईल असे बोलले जात आहे. खरोखरच मालकाला अंधारात ठेवून वेश्याव्यवसाय चालत होता का याची चौकशी होणे फार गरजेचे असल्याचे नागरिकांची म्हणणे आहे.
*या पद्धतीचे धंदे चालत असल्याने युवा पिढी साठी चिंताजनक बाब…*
दरम्यान रत्नागिरी पुन्हा एकदा आंबटचौकीन गिऱ्हाईक तयार झाली असून मुलींचा गैर फायदा घेत असल्याचे दिसून येत आहेत. हे रत्नागिरीत वारंवार चालत असून सुशिक्षित आणि संस्कृत असलेल्या रत्नागिरी असे धंदे चालत असतील तर भावी पिढीला यातून काय बोध होणार हे चिंताजनक आहे.रत्नागिरी
मध्ये अशा घटना वारंवार घडलेल्या आहेत.दरम्यान याबाबत गिर्हाईक म्हणून रत्नागिरी, लांजा तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून गिऱ्हाईक येत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान अरमान खान बरोबर अजून एक त्याचा मित्र असून असे दोघेजण मुलींना या देह विक्रीसाठी वापरत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
*पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास करावा…*
दरम्यान याबाबत पोलिसांनी आता तपास सुरू केलेला असून पोलिसांनी याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करावा असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. ज्या उद्देशासाठी आहे हॉटेल चालवण्यासाठी घेतले होते तो उद्देश बाजूला ठेवून अनैतिक धंद्यासाठी हॉटेल सुरू केल्याची म्हटले जात आहे कारण हा भाग हा वरच्या बाजूला असल्यामुळे हायवे वरून येणाऱ्या लोकांसाठी तो जवळच होत. कारण शहरात याबाबत पोलिस यंत्रणा कडक झाली असून वारंवार लॉज हॉटेल यांची तपासणी केली जाते परंतु शहरातील वरच्या भागातील विशेषतः जे. के. फाईल्स वरच्या भागातील भागात जास्त करून पोलीस म्हणावा तेवढा तपास करत नाहीत.
*अनैतिक धंद्याला पाठबळ कोणाचे?..*
सदरच्या अनैतिक धंद्याला कोणाचे पाठबळ आहे याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. लवकरच सत्य समोर येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.कारण रहदारी पासून हे हॉटेल थोडं लांब असल्यामुळे येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे म्हटले जात आहे असे अजून याच्यात काही धंडे किंवा बडे लोक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.