
नवी दिल्ली – देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे.
आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मोदींवर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने निर्णय देत याचिका फेटाळली आहे. ही याचिका वकील आनंद जोंधळे यांनी दाखल केली होती. मोदींवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मोदी यांच्या वक्तव्या विरोधात निवडणूक आयोगात प्रकरण प्रलंबित असताना न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.