रत्नागिरी: प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत यांच्या नेतृत्वाखाली जुनी पेंशन चालू करावी, निवडणुकीत ई व्हि एम मशीनचा वापर बंद करावा, ओ बी सी ची जात निहाय गणना करण्यात यावी अशा राज्य सरकारकडे करण्यात आली असून या आणि या आणि अन्य मागण्यांचे निवेदन आज जिल्हा रत्नागिरीच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे सादर करण्यात आले.
या निवेदनात प्रमुख मागण्या प्रमाणेच बिहार राज्यात कशी ओबिसिची जात निहाय जनगणना झाली तशी महाराष्ट्र राज्य मध्ये करण्यात यावी. ओबीसी, मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजाशी सलग्न विविध महामंडळाची कर्ज माफ करून शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरित मागे घ्याव्यात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा. महविकास आघाडीच्या काळात जिल्ह्यात ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना वसती गृह सुरू करण्याच्या निर्णयाची त्वरित अमल बजावणी करण्यात यावी, अशा मागण्याचे निवेदन ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष वासुदेव सुतार यांच्या मार्फत उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे देण्यात आलेे. त्यावेळी या विभागाचे जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर, गजानन दळी, भगवान सुतार, रमेश पांचाळ,संतोष माचकर,संजय नांदगावकर,राजेंद्र माचकर, शंकर निवळकर, शैलेश शिळकर,आरती निवलकर , संजय माचकर इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
जाहिरात