
कल्याण डोंबिवलीकरांना गाजर? चार्जिंग स्थानक कागदावर का?
ठाणे: निलेश घाग कल्याण डोंबिवली उपक्रमात टप्प्या टप्याने २००हून अधिक प्रमाणात इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून यातील काही बस बुधवारी KDMC उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. खंबाळ-पाडा आगारात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्यांचा वेढा असल्याने पालिकेच्या उपक्रमा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या E-बस वसंत व्हॅली आगारात एकाकी पडलेल्या अवस्थेत आहेत.

पालिकेकडे जागेचा पत्ता नसताना दुसरीकडे E-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणीलाही अध्याप शुभ मुहूर्त मिळालेला नाही.
निविदा तसेच करार नामाची पार प्रक्रिया पडल्याने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात E-बस होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
के.डी.एम.टीच्या अंदाजपत्रकात E-बस आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे वाढलेला कल पाहता के.डी.एम.सी.ने स्वतःच्या मालकीची व पी.पी.पी तत्वावर ६१ चार्जिंग स्टेशन उभारण्याचे जाहीर केले होते. परंतू आजपर्यंत एकही चार्जिंग स्टेशन उभारू शकले नाही?
• चार्जिंग स्टेशन उभारणीकडे दुर्लक्ष झाले असताना दुसरीकडेज्या ठिकाणी ई-बस ठेवल्या जाणार आहेत त्याच खंबाळपाडा आगारात घनकचरा व्यवस्थापन विभागाची वाहने आहेत
• आजरीत्या E-बस ठेवण्याच्या दृष्टीकोनातून कोणतेही
नियोजन केलेले नाही. प्रशासनाकडून वसंत व्हॅली आगारात या बस ठेवण्याचे नियोजन केले गेले असले, तरी प्रवाश्यांचा वाढता कल बघता बस वाढविणे गरजेचे आहे. त्यात जागेची कमतरता भासणार ! यात तिळमात्र शंका नाही.
जाहिरात


