ठाणे : ठाणे पालिका आयुक्तांनी दिव्यातील शिंदे गटाचे तथाकथित नेते मढवी आणि त्यांच्या अन्य नगरसेवकांच्या मागील पाच वर्षाच्या अपयशाचा पाहणी दौरा केला, असा घनाघाती आरोप भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष व सेव्ह दिवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी आयुक्तांच्या दौऱ्यावर बोलताना केला आहे.
व्हिडीओ पहा सविस्तर रोहीदास मुंडे काय म्हणाले…..
दिवा शहरात नागरी सुविधांची महत्वाची कोणतीही कामे मागील पाच वर्षात मार्गी लागली नाहीत हेच आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट होते. दिवा पूर्व- पश्चिम ब्रिज, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न, पाणी वितरणासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या,पाणी रीमॉडेलिंग योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्या नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अद्याप सुरू नसल्याने नागरिकांना पाणीटंचाई सामोरे जावे लागत आहे.
मुख्यमंत्र्यांनी पाणी योजनेचे उद्घाटन करून अद्याप दिव्यातील नागरीकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
मग पाण्यासाठीचा निधी गेला कुठे असा प्रश्न ही रोहिदास मुंडे आणि विचारला आहे. दिव्यातील कचरा समस्या, गटारांची समस्या, फेरीवाल्यांचा प्रश्न, वाहतूक कोंडी अशा अनेक प्रश्नांवर सत्ताधारी शिंदे गटाचे माजी नगरसेवक अपयशी ठरल्याचे या पाहणी दौऱ्यातून आयुक्तांच्या लक्षात आले असेल असा सणसणीत टोला भाजपचे माजी मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी लगावला आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात