मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी…
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत १.४९ टक्क्यांनी कमी निकाल लागला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
लातूर पॅटर्न’ पुन्हा फेल –
यंदा कोकण विभागाचा सर्वाधिक ९६. ७४ टक्के तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९४६ टक्के इतका लागला आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळातून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० % आहे.⁸
विभागनिहाय निकाल-
पुणे-९१.३२ टक्के
कोकण- ९६.७४ टक्के
नागपूर- ९१.३२ टक्के
छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के
मुंबई- ९२.९३ टक्के
कोल्हापूर- ९३.६४ टक्के
अमरावती- ९१.४३ टक्के
नाशिक – ९१.३१ टक्के
लातूर – ८९.४६ टक्के
बारावीच्या बोर्ड परीक्षेस नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे. सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.