ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) दूषित पाणीपुरवठ्याने
आमच्या सहा वर्षाच्या मुलीचा जीव घेतला असा टाहो दिवा
शहरातील गणेश नगर भागातील रसाळ कुटुंबीयांनी फोडला आहे. सुशीला रसाळ यांची नात मानसी रसाळ तिचे वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी काविळीने निधन झाल्याने रसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दिवा शहरात बहुतांश भागात
इमारती व चाळींना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन या गटारातून टाकण्यात आलेल्या आहेत.
यातील अनेक पाण्याच्या लाईन असंख्य ठिकाणी लिकेज असल्याने त्यातून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड शहरातील नागरिक
वारंवार करत असतात. मात्र पालिका प्रशासनाचा पाणीपुरवठा विभाग ढम्म असल्याने नागरिकांना तक्रारी करूनही न्याय मिळत नाही. मानसी रसाळ ही
मानसी रसाळ ही अवघ्या ६ वर्षांची चिमुकली गंभीर स्वरूपाच्या कावीळ आजाराची बळी ठरली आहे. तिच्या कुटूंबियांनी उपचारासाठी तिला नायर रुग्णालयात दाखल केले होते १२ दिवस त्या चिमुकलीने मृत्यूशी झुंज दिली. मंगळवारी २८ मार्चला तिचे दुर्दैवी निधन झाले.हसती खेळती मुलगी आपल्याला सोडून गेल्याने रसाळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पाणीपुरवठा मानसीच्या मृत्यूस शहरात होणारा दूषित कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.