गाडी डीजे वाजवण्यासाठी निघाली, चप्पल एक्सलेटरमध्ये अडकली अन् आयुष्याचा डीजे वाजला, दोघांचा दुदैवी मृत्यू

Spread the love

चंद्रपूर :कार्यक्रमात डीजे वाजवण्यासाठी ते निघाले होते. पण वाहन चालवताना चप्पल एक्सलेटरमध्ये अडकली. आणि वाहनावरील नियंत्रण सुटलं. यामुळे वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर दुसऱ्याने उपचारादरम्यान प्राण सोडला. ही घटना सोनापूर फाट्याजवळ रविवारला सायंकाळी घडली. आनंद बोलमवार, अमन भोयर अशी मृतकांची नावं आहेत

जिल्हातील मूल शहरातून पोंभुर्णा मार्गे विठ्ठलवाडा येथील एका कार्यक्रमासाठी डीजेचं पथक घेऊन टाटा एस वाहन निघालं होतं. वाहनात डीजेचं साहित्य आणि चार तरुण होते. पोंभुर्णा- चिंतलधाबा मार्गावरील सोनापूर फाट्याजवळ अन्य वाहनांना बाजू देत असताना नेमकं त्याचवेळी चालकाची चप्पल एक्सलेटरमध्ये अडकली. त्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. अनियंत्रित झालेल्या वाहनाने मार्गालगत असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली.

अपघातात गोलू देशमुख, लक्ष्मण बावणकर, चालक गीतेश्वर बावणे, आयुष लाकडे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दोन तरुणांचा मृत्यूने मूल, पोंभुर्णा तालुक्यात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात अपघाताची संख्या वाढली आहे. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page