
गौरव पोंक्षे/ माखजन-दि १७ जुलै- महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वाढीव २०% पगारासाठी,आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ९७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला ७ जुलै नन्तर वेगळे वळण लागले होते. ८,९ जुलै रोजी राज्यातील अंशतः अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवत,आझाद मैदानात शिक्षकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती.१४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार व गतवर्षीच्या पावसाळी अधिवेशनातील तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्या घोषणे नुसार १ जून पासून वाढीव २०% अनुदान द्या अशी एकमात्र मागणी करण्यात आली होती.हे शासन निर्णयानंतरचे तिसरे अधिवेशन असल्याने,हा प्रलंबित विषय विधिमंडळात चांगलाच गाजला.
९ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आंदोलक,शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आदींसह मंत्री गिरीश महाजन यांच्या सह अन्य माजी शिक्षक आमदार यांच्या समवेत बैठक घेतली.व बैठकीत आम्ही वाढीव २०% देत आहोत.शिक्षकाना जुलै चा पगार वाढीव २०% ने अदा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.सदर निर्णयाची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात केली होती.

दरम्यान च्या काळात ९ जुलै रोजी झालेल्या बैठकी नुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व अन्य आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सतत भेट घेत होते.भेटी दरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी १८ रोजी अधिवेशन संपण्यापूर्वी दिलेल्या शब्दाप्रमाणे निधीसह घोषणा केली जाईल असे सांगितले होते.परंतु १७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव टप्प्यासाठी ९७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे जुलै पेड इन ऑगस्ट असा वाढीव २०% ने पगार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
त्यामुळे शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..
या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे आभार मानले जात आहेत.
वाढीव २०% टप्पा मिळण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आ.निरंजन डावखरे, आ. अभिजित वंजारी,आ सुधाकर अडबाले,आ रोहित पवार,आ जयंत अभ्यंकर, आ.जयंत आसगावकर, आ.विक्रम काळे,आ किरण सरनाईक,आ किशोर दराडे, आ.सतीश चव्हाण, आ.सतेज उर्फ बंटी पाटील, आ.सत्यजित तांबे,आ मंगेश चव्हाण,माजी आ. श्रीकांत देशपांडे, माजी आ.दत्तात्रय सावंत आदींनी मोठे प्रयत्न केले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
