सीएनजी अभावी बस ठप्प; एसटी महामंडळावर बसेस उभ्या ठेवण्याची नामुष्की….

Spread the love

एकीकडे घटत असलेली प्रवासी संख्या, तर दुसरीकडे कमी होत असलेले उत्पन्न याच्या कात्रीत सापडलेल्या एसटी महामंडळाला सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे एसटी बसेस स्थानकात उभ्या करून ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे….

ठाणे/ प्रतिनिधी : एकीकडे घटत असलेली प्रवासी संख्या, तर दुसरीकडे कमी होत असलेले उत्पन्न याच्या कात्रीत सापडलेल्या एसटी महामंडळाला सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे एसटी बसेस स्थानकात उभ्या करून ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे.

एसटी महामंडळाच्या बस टप्प्याटप्प्याने सीएनजीवर चालविल्या जात आहेत. परंतु सीएनजीचा अपुरा पुरवठा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अचानक कर्मचाऱ्यांकडून सीएनजी पुरवठा करण्यास असमर्थतता दर्शविणे आदींसह इतर कारणांचा फटका एसटीच्या ठाणे विभागातील जवळपास २४६ सीएनजी बसना बसत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यातही १ ऑगस्ट रोजी तर पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ कंत्राट नूतनीकरण न झाल्याचा फटका एसटीच्या ३० ते ४० बसला बसल्याचे दिसून आले आहे. ठाणे विभागात एसटीच्या ५१६च्या आसपास बस आहेत. त्यातील २४६ बस या सीएनजीमध्ये परावर्तीत करण्यात आल्या आहेत. तर २७० बस या आजही डिझेलवर चालविल्या जात आहेत. या बसदेखील टप्याटप्याने सीएनजीमध्ये परावर्तीत करण्यात येणार आहेत. एसटीच्या ठाणे २, विठ्ठलवाडी आणि भिवंडी येथे सीएनजीची डेपो आहेत, तर ठाणे १ मध्ये सीएनजीच्या ४३ च्या आसपास आणि ठाणे २ मध्ये ५५ च्या आसपास सीएनजीवर धावणाऱ्या बस आहेत.

प्रदूषण रोखण्यासाठी डिझेलवर धावणाऱ्या बस सीएनजीवर परावर्तीत केल्या जात आहेत. परंतु आता याच सीएनजीची फटका एसटीसह प्रवाशांना देखील सहन करावा लागत आहे. १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत खोपट डेपो येथे असलेल्या सीएनजीच्या केंद्रावर सीएनजी भरण्यासाठी एकही कर्मचारी आला नाही. त्यामुळे याठिकाणी बसच्या रांगा लागल्या होत्या. अखेर एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सीएनजी भरण्यास सुरुवात झाली. परंतु तो पर्यंत सकाळच्या सत्रात ३० ते ४० फेऱ्या ठाणे १ व २ मधून रद्द झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. तर काही बस या ठाण्यातील विविध मार्गावर लेटमार्क लागल्याचे दिसून आले. एकूणच मागील ८ महिन्यात तब्बल २१ वेळा अशा एसटीला फटका बसला असून त्यातून प्रवाशांना त्रास आणि एसटीला नुकसान देखील सोसावे लागल्याची बाब समोर आली आहे.

या मार्गावर धावतात बस..

एसटीच्या ताफ्यात सीएनजीच्या २४६ बस आहेत. या बस ठाण्यासह भिवंडी, कल्याण, बोरिवली, मीरारोड आदींसह इतर काही मार्गांवर धावत आहेत. शिवाय काही बस या राज्यातील इतर काही भागांतही जात असल्याची माहिती एसटी विभागातील सूत्रांनी दिली.

सीएनजीच्या अडचणी…

नोझल मॅच होत नसल्याने सीएनजी भरता न येणे, सीएनजी पंपाचे कॉम्प्रेसरचे काम असल्याने ठाणे २च्या आगारच्या बसमध्ये सीएनजी भरला आला नाही, पंप मेटेंनन्ससाठी बंद, हाय व्होल्टेजमुळे पंप बंद असणे, वीजपुरवठा खंडित झाल्याने सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंप बंद, कमी व्होल्टेजमुळे पंप बंद ठेवणे, तांत्रिक कारणासाठी पंप बंद ठेवणे, सीएनजी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने त्याचा फटकाही बसल्याचे दिसून आले.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page