Chiplun : चिपळुणातील भाजी मंडई म्हणजे चिपळूण शहरातीलच नव्हे तर कोकणातील अनेक शहरांमधील शहराच्या गरजेच्या असलेल्या प्रकल्पांची कशी वाताहात होते आणि नागरी सुविधांबद्दल येथील लोकप्रतिनिधी किती असंवेदनशील आहेत, याचे ठळक उदाहरण आहे. १५ वर्षांत वास्तू उभी राहून त्याचा शून्य उपयोग, उपयोगात आणताना आडवे येणारे राजकारण, स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात चिपळूणसाठी नगरपालिकेचा कारभार अधोरेखित होतो. नागरी सुविधांसाठी शहरातील नागरिक सजग नसतील तर अशा प्रकल्पांचा उपयोग न होता ते फक्त नागरिकांना भार कसे होतात आणि लोकांचेच पैसे कसे वाया जातात, याचेही ते बोलके उदाहरण आहे. स्मार्ट सिटी म्हणून मिरवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या अशा शहरांतून भाजी मंडईचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न म्हणजे शहराच्या विकासाची एक प्रकारे शोकांतिकाच आहे. जनतेसाठी बांधण्यात आलेली वास्तू आज पडून आहे.
जाहिरात :