मुंबई- राज्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशन मुंबईमध्ये पार पडत आहे. आज राज्याचे अर्थमंत्री देवेद्र फडणवीस दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प जाहिर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. शेतकरी वर्ग गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने चिंतेत पडला आहे. तसंच दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे व अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्वांवर यंदाच्या अर्थसंकल्पातून तोडगा निघणार का हे पाहावं लागणार आहे.