
ठाणे ; वृत्त मुंबई ;अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील १०० टक्के भूसंपादन झाले असून . आता विविध पायाभूत कामे करण्यासाठी स्वी-कृतीचे पत्र जारी करण्यात येत आहेत.
ठाण्यात सुमारे ५५ हेक्टर क्षेत्रात डेपो उभारण्यात येणार असून सदर डेपोत ट्रेनची देखभाल केली जाईल. सुरुवातीला ४ मार्गिका आणि १० उपमार्गिका बांधण्यात येणार आहेत. भविष्यात त्या अनुक्रमे ८ आणि ३१ पर्यंत वाढविण्यात येण्याची शक्यता आहे, ठाणे बुलेट ट्रेन डेपोच्या बांधकामसाठी स्वीकृती पत्र मेसर्स दिनेशचंद्र- डीएमआरसी जेव्ही यांना जारी केले आहे. यात पायाभूत कामे, तपासणी शेड, देखभाल,दुरुस्ती डेपो यांचा समावेश आहे. तसेच ४० प्रकारच्या विविध यंत्रणा जपानकडून खरेदी केल्या जाणार आहेत.

सर्वाधिक मोठा डेपो साबरमती येथे उभारण्यात येणार असून सुमारे ८३ हेक्टर क्षेत्रफळावर ते उभारण्यात येणार आहे. तेथे वाॅशिंग प्लांट, वर्कशॉप, शेड असतील. या डेपोत १० उपमार्गिका नियोजित असून भविष्यात २९ उपमार्गिका वाढवल्या जातील. सुरतमध्ये ४० हेक्टर क्षेत्रफळावर रोलिंग स्टॉक डेपो उभारण्यात येणार असून ते सुरत स्थानकापासून साधारण २ किमी अंतरावर उभारण्यात येणार आहे.
जाहिरात

जाहिरात



जाहिरात
