
रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी बुधवारी दुपारी एक महिला बेशुद्ध अवस्थेत मिळून आली होती. त्या महिलेची ओळख पटली असून तिला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञा श्रीप्रकाश बिर्जे (६५, रा.आरटीओ रोड कुवारबाव, रत्नागिरी) असे त्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवार १६ जुलै रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. बुधवारी दुपारी भाट्ये गावचे स्थानिक नागरिक तहा काद्री आणि सरपंच पराग भाटकर यांना भाट्ये समुद्रकिनारी ही महिला समुद्राच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. त्यांनी तातडीने तिला तहा काद्री यांच्या गाडीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिला उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी रात्री महिलेचा मुलगा चंदन बिर्जेने तिला अधिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर