ॲडलेड- दुसऱ्या कसोटीत दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 128 धावा केल्या आहेत. टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 29 धावांनी मागे आहे. भारताच्या दुसऱ्या डावात सध्या रिषभ पंत 28 धावा आणि नितीश कुमार रेड्डी 15 धावा करून क्रिजवर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडनं प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मिचेल स्टार्कला एक विकेट मिळाली.
पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रमाणेच दुसऱ्या दिवशीदेखील ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा पाहायला मिळाला. भारताने दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३७ धावांवर आटोपला. ट्रेव्हिस हेडचे शतक यावेळी भारताला चांगलाच महागात पडले. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला खरा, पण त्यांनी महत्वाचे पाच विकेट्स गमावले. त्यामुळे भारतीय संघ आता तिसऱ्या दिवशी कशी फलंदाजी करतो, यावर सामन्याचा नूर ठरणार आहे. दुसऱ्या दिवस अखेर भारताची ५ बाद १२८ अशी स्थिती आहे. यावेळी ऋषभ पंत (२८) आणि नितीश कुमार रेड्डी (१५) हे दोघेही आक्रमक क्रिकेट खेळत आहेत. भारत आता २९ धावांनी पिछाडीवर आहे.
त्यामुळे भारताला भारताला कमबॅक करण्याची तिसऱ्य दिवशी अखेरची संधी असणार आहे. भारताचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला, पण त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी घेतली. त्यामुळे भारताला प्रथम ही धावसंख्या पूर्ण करायची होती. पण ती ओलांडण्यापूर्वीच भारताला एकामागून एक चार धक्के बसले. लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला, तो सात धावा करू शकला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांची चांगली जोडी जमली होती. पण स्कॉट बॉलंडने यशस्वीला २४ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने चौकारानिशी दमदार सुरुवात केल.