
दीपक भोसले/संगमेश्वर- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक १० जून वर्धापन दिन नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग, लोवळे संगमेश्वर येथे उत्साहात व औपचारिकतेने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या ध्वजारोहणाने झाली. यावेळी विद्यापीठ गीत लावून ध्वजाला सलामी देण्यात आली. ध्वजवंदनाचा सन्मान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. संजना आंब्रे, प्रा. स्नेहल खेराडे, अमृता पाल्ये, प्रेरणा महाडिक, नेहा सरवणकर, साक्षी जाधव, रोशनी तोडकरी, अंजली कंगणे, दीपक भोसले, योगेश सरकटे, ओंकार जाधव यांसह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रा. स्नेहल खेराडे यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या इतिहासाची माहिती देत वर्धापन दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यापीठाच्या उभारणीतील योगदान, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांसाठी असलेले विविध उपक्रम यांची माहिती त्यांनी दिली. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या एकात्मतेचे व विद्यापीठाशी असलेल्या नात्याचे प्रतीक ठरला.