भाजपामध्ये प्रवेशाचे सत्र खांदेपालटानंतरही सुरूच…

Spread the love

प्रमोद जठार, राजेश सावंत, प्रमोद अधटराव यांच्या उपस्थितीत अनेकांनी धरली भाजपाची कास.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम यांच्या संघटनकौशल्यामुळे युवकांनी केला भाजपा प्रवेश.

देवरुखमधील या प्रवेश सोहोळ्याचे शिल्पकार असलेल्या सर्व युवा कार्यकर्त्यांचे प्रमोद जठारांनी व जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी केले मनसोक्त कौतुक.

महाराष्ट्र प्रवक्ता न्यूज | देवरुख | ऑक्टोबर ०३, २०२३.

देवरुख येथे संपन्न झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सन्मान सोहोळ्याप्रसंगी कणकवलीचे मा. आमदार तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार, भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेशाचा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संगमेश्वर (उ.) चे तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के व संगमेश्वर (द.) चे तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम, ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री.अभिजीत शेट्ये, जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे, अमित केतकर, संगीताताई जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या पक्ष प्रवेशासाठी संगमेश्वर तालुक्यातील विविध जि.प. गटातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी अनुकूलता दर्शवत आधीच्या पदांचा त्याग करत सहकार्य केले. भाजपाची ध्येयधोरणे लोककल्याणकारी असून ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ हे ब्रीद सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रेरित करते यावर विश्वास ठेवून या सर्वांनी पक्षात प्रवेश केला. यामध्ये कोसुंब जि. प. गटातील श्री. निलेश डोंगरे, श्री. संदीप राणे, श्री. संकेत डोंगरे, श्री. तेजस डोंगरे, श्री. धीरज चव्हाण, श्री. सूरज शिगवण, श्री. संदीप पड्याल, श्री. संतोष पड्याल, श्री. श्रीकांत शेलार, श्री. संतोष जाधव, श्री. दत्ताराम पड्याल, श्री. शैलेश पाताडे, श्री. सुरेश होरांबे, श्री. दाजी होरांबे, श्री. जयवंत सनगरे, श्री. मिलिंद सनगरे, श्री. दिलीप गेल्ये, श्री. सागर चव्हाण, श्री. सागर बावदाने व ओझरे जि. प. गटातील अमीत रेवाळे किशोर करंबेळे, सुरज रेवाळे,आदि कार्यकर्त्यांनी आपल्या मूळ पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये मा. मोदीजींच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

यावेळी श्री. प्रमोद जठार व श्री.राजेश सावंत यांनी नव्या भाजपा कार्यकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या पक्ष प्रवेशासाठी नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम, पदवीधर प्रकोष्ठ जिल्हा संयोजक श्री. निलेश भुरवणे, श्री. बंटी शिंदे व सोशल मिडिया जिल्हा संयोजक अमोल गायकर यांनी अविरत प्रयत्न केले. यामुळे कोसुंब जि.प. गट व ओझरे जि.प. गटात भाजपाची ताकद वाढणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page