
पनवेल, दि. १८ (वार्ताहर): पनवेल रेल्वे स्थानकावर आज सकाळी एक मोठा धक्का देणारा प्रकार उघडकीस आला. मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडून तब्बल ३.५ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) पथकाने गोपनीय माहितीनंतर ही धाडसी कारवाई केली.
विशेष म्हणजे हे ड्रग्स खाण्याच्या पुड्यांमध्ये लपवून नेले जात होते. परंतु अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही खेप हुलकावणी देऊ शकली नाही. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची अंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३५ कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या हे ड्रग्स रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेले दोघे कोणत्या टोळीचे सदस्य आहेत का?, त्यांच्या मागे कोण आहेत? याचा शोध NCB व रेल्वे पोलिसांनी सुरू केला आहे.

पनवेलसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडणे ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटचा मोठा तपशील बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणा आता ड्रग्स नेटवर्कचा मुळापासून शोध घेण्याच्या तयारीत आहेत.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, रेल्वेमार्गांचा वापर ड्रग्स वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असून, अशा मार्गांवर चौकशी अधिक कडक करण्याची गरज आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
