दापोली येथील वृध्द महिलेच्या खुन प्रकरणातील आरोपी महिलेला पोलीसांनी १२ तासात केले जेरबंद..

Spread the love


  • खेड ,, (प्रतिनिधी )
    दिनांक १६ जुलै रोजीचे रात्रौ८ ते दि. १७ जुलै रोजीचे सकाळी ०७.०० वा. चे दरम्यान दापोली तालुक्यातील विसापूर, विश्रांतीनगर, मधलीवाडी, ता. दापोली येथे घरात एकटी राहणारी वृध्द महिला दिपावती सिताराम घाग, वय ८७ हिच्या छातीवर कोणीतरी अज्ञात आरोपीने जोरदार प्रहार करुन तिचा खून केला तसेच तिच्या गळ्यातील ७८,०००/- रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ जबरीने चोरुन नेली म्हणून दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ११९ / २०२३ भादविक ३०२, ४५२,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
    सदर घटनेची माहिती दापोली पोलीसांना प्राप्त होताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावून घटनास्थळाची पाहणी करुन आजुबाजुचे लोकांकडे चौकशी केली त्यातून मयत हिस चोरीच्या उद्देशाने स्थानिक आरोपीनेच ठार मारले असल्याचा संशय आल्याने आजुबाजुला राहणारे तसेच तिचे नातेवाईक व स्थानिक गावकरी यांचेकडे सातत्याने कसून चौकशी केल्यानंतर आरोपी महिला सृष्टी संतोष कदम, वय ३७ रा. विसापुर मधीलवाडी ता. दापोली हिचेवर दाट संशय आल्याने तिचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता ती प्रथम उडवाउडवीची उत्तरे देवू लागली त्यानंतर तिला आणखी विश्वासात घेवून चौकशी केली असता तिनेच गुन्हा केल्याची खातरजमा झाली, अशा प्रकारे •अवघ्या १२ तासात मयत हिस आरोपी हिने जीवे ठार मारून गळयातील सोन्याची बोरमाळ चोरुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, दापोली पोलीस ठाणे हे करीत आहेत.
    सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विवेक अहिरे, पोलीस निरीक्षक, दापोली पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक श्री. राजकुमार यादव, श्री. महेश पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, स्वप्नील शिवलकर, रुपाली ढोले, पोलीस नाईक निधी जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, विजेंद्र सातार्डेकर, सुरज मोरे, पंकज पवार, सुहास पाटील, चालक निलेश जाधव, शुभम रजपूत यांनी केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page