56 व्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिंधुदुर्ग विभागीय युवा महोत्सवाचे झाले शानदार उद्घाटन
▪️आनंदीबाई रावराणे आर्ट्स अँड कॉमर्स व सायन्स कॉलेज वैभववाडी येथे युवा महोत्सवाला झाली सुरुवात
वैभववाडी : मुंबई युनिव्हर्सिटी चा 56 व्या विभागीय सिंधुदुर्ग युवा महोत्सवाचे वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे छानदार उद्घाटन झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या दोन क्रमांक मुंबई युनिव्हर्सिटी येथे होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन करणार आहे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भाव मिळाले म्हणून मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून या युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते हा 56 युवा महोत्सव असून सिंधुदुर्गातील अनेक विद्यार्थ्यांना या युवा महोत्सवात सहभागी होऊन आपले कलागुण द्विगुणित करण्याची संधी मिळणार आहे एकूण ४२ प्रकारचे इव्हेंट या युवा महोत्सवाच्या माध्यमातून घेतले जातात जिल्हा विभागीय स्तर विद्यापीठ सर आणि पुढे राष्ट्रीय स्तर अशाप्रकारे विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाते पुढे याच कलागुणांना वाव देऊन विद्यार्थी स्वतःचे करिअर सुद्धा घडू शकतात व उच्च पदावर जाऊ शकतात
यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक प्रमुख डॉ निलेश सावे सर जिल्ह्याचे सांस्कृतिक समन्वयक आशिष नाईक श्री शरदचंद्र रावराणे सज्जनकाका रावराणे, संजय रावराणे, प्राचार्य सी एस काकडे उपस्थित होते.