
प्रतिनिधी/ विनोद चव्हाण- ओमकार रेल्वे भजन मंडळाचा १९ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. हा सोहळा रविवार, २ मार्च २०२५ रोजी साईच्या विद्यालय, नालासोपारा (पूर्व) येथे संपन्न झाला. सकाळी ७.०० वाजता सत्यनारायण महापूजेनंतर १०.०० वाजता दीपप्रज्वलन आणि १०.३० वाजता पंचपदी कार्यक्रमाने सोहळ्याची सुरुवात झाली. यंदाचा पंचपदीचा मान श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, आई जीवदानी भजन मंडळ, हेरंब भजन मंडळ, ओम साई भजन मंडळ आणि श्री साई गणेश भजन मंडळ यांना देण्यात आला.
सुंदर पंचपदी कार्यक्रमानंतर प्रसिद्ध डबलबारी बुवा नितेश धुळप यांनी मनोहर गजर सादर केला. तसेच आनंद शेनॉय व ह.भ.प. संतोष पवार यांनी दिंडी सोहळ्याचे नेतृत्व केले. त्यांना जीवन मोरे, संतोष पवार, चंद्रकांत गुरव, भरत माने, सुधीर आयरे, दर्शन नवाळे, शाहीर नितीन रसाळ, अरविंद मोरे, प्रकाश भाताडे, विनोद बैकर, प्रवीण पांढरे, शंकर माळी यांच्यासह अनेक माऊलींनी साथ दिली. पखवाज वादनासाठी प्रसिद्ध वादक दयानंद पवार, सिद्धेश पुजारी, लोमेश टाकळे, आप्पा गावडे यांनी उत्तम साथ दिली.
रक्तदान शिबिर आणि सत्कार सोहळा.



रिंगण सोहळ्यानंतर संत सेवा भजन सामाजिक संस्था आयोजित रक्तदान शिबिरात भाग घेतलेल्या रक्तदात्यांचा शिवसेना तालुका प्रमुख स्वप्निल बांदेकर, युवा सेना अधिकारी रोहन चव्हाण (ठाकरे गट) आणि त्यांचे सहकारी, तसेच अजित खांबे साहेब, निलेश तेलंगे साहेब (शिंदे गट) व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अशोक पिंपळे (माजी उपसचिव, महाराष्ट्र विधिमंडळ) व श्री. मयूर भागवत पिंपळे (उद्योजक) उपस्थित होते.
सन्मान आणि विशेष उपक्रम कार्यक्रमासाठी श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे सल्लगार श्री. जयराम पवार, अध्यक्ष शिवाजी पाटील, जनार्दन धयाळकर, विनोद चव्हाण, प्रेमनाथ गुरव, कृष्णा सुर्वे, जीवन मोरे, विठ्ठल मयेकर, सुनील जोगळे, चंद्रकांत गुरव आणि इतर सदस्य उपस्थित होते. यावर्षी उपस्थित सर्व भजन मंडळांचा ओमकार भजन मंडळातर्फे शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मंडळाद्वारे रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आदी उपक्रम राबवले जातात. तसेच, मंडळाच्या सदस्यांना वैद्यकीय मदतही पुरवली जाते.
सभासदांच्या कुटुंबीयांचा सत्कार समारंभ, महिला व पुरुषांसाठी लकी ड्रॉ, महिलांसाठी हळदीकुंकू, विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा आणि लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटप करण्यात आले. अखेरीस भैरवीने सोहळ्याची सांगता झाली.
हा कार्यक्रम मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. शिवाजी भानत, अध्यक्ष प्रभाकर नागरेकर, सल्लागार सुधाकर बाईत, राजेंद्र दवंडे, नथुराम बुरटे, काशिनाथ बाईंग, मुख्य बुवा विजय शिगवण, मंगेश धाडवे, शिवाजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. तसेच उपाध्यक्ष निलेश रेशीम, खजिनदार बबन डोंगरे, अरुण भानत, रुपेश निवगुणे, सचिव अंकुश घाडी, उपसचिव रुपेश किरंजे, गुरु सुरेश शिंदे, हिशोब तपासणीस गुरु गुरव, दशरथ गोठल, युवा कार्यकर्ते अनिल बटावले, रोशन मोरे, दिनेश शिगवण, सुहास कीजिबिले, प्रमोद मांडके, संतोष जगताप, अनंत शितप, बिपिन बाईत, किरण दिवेकर, निलेश बटावले, राजकुमार ढमाले, सचिन कानसरे, उदय आंबडसकर आणि सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा यशस्वी झाला.