बुलढाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा संपन्न….

Spread the love

बुलढाणा- बुलढाणा लोकसभा व विधानसभा मतदरसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते मा. ना. एकनाथजी शिंदे आज बुलढाणा येथे आले होते. बुलढाणाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर मा.संजय गायकवाड यांनी भव्य अशा आभार सभेचे जिजामाता प्रेक्षागार, बुलढाणा येथे आयोजन केले होते.

याप्रसंगी शिवसेना नेते मा. श्री. विजयजी अंभोरे यांनी मा. ना. एकनाथजी शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून समाजातील वंचितांना न्याय द्यावा ही मागणी केली व तसे निवेदन त्यांना दिले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री मा. ना. प्रतापराव जाधव , मा.ना. गुलाबराव पाटील , मा.ना. संजयजी राठोड ,माजी केंद्रीय मंत्री मा.आनंदराव आडसुळ  , माजी आमदार मा.डॉ. शशिकांत खेडेकर ,माजी आमदार मा.संजयजी रायमुलकर  युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य मा.मृत्युंजय गायकवाड़ ,मा. सौ . ज्योतीताई वाघमारे , जिल्हाप्रमुख मा.ओमसिंग राजपूत , जिल्हा प्रमुख मा. शांताराम दाणे व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व तालुका प्रमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page