
पहिल्यांदाच खेळून दिवा शहरातील कु. आयुषी अश्विनी अमोल केंद्रे हिने जिंकले रौप्यपदक!
उझबेकिस्तान- कोल्हापूर येथे कुराश असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. २९ व ३० मे २०२४ रोजी पार पडलेल्या सब ज्युनिअर स्टेट कुराश चॅम्पियनशिप २०२४-२०२५ मध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत दिवा शहरातील कु. आयुषी अश्विनी अमोल केंद्रे हिने पहिल्यांदाच सहभागी होत अत्युत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.
या यशाबद्दल कु. आयुषी व त्यांचे प्रशिक्षक मुंबई विभाग प्रमुख व कोच आकाश जाधव सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ,आकाश सरांच्या मार्गदर्शनाखाली आयुषीने याआधीही २०२३ व २०२४ मध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय “खेलो इंडिया अस्मिता वुमन्स स्पर्धांमध्ये” सलग दोन वेळा सुवर्णपदक जिंकले होते.
या वर्षी उझबेकिस्तान देशाचा पारंपरिक खेळ “कुराश” यामध्ये पहिल्यांदाच भाग घेत, मर्यादित तयारी असूनही आयुषीने प्रभावी खेळ करत दुसरा क्रमांक मिळवला.आकाश सर म्हणाले की – “आयुषी ही अत्यंत जिद्दी आणि चिकाटीने खेळणारी खेळाडू आहे. तिला कुराशबाबत फारशी माहिती नव्हती आणि गावी असल्यामुळे सरावाचीही संधी मिळाली नव्हती. जर तयारीची संधी अधिक मिळाली असती, तर ती निश्चितच सुवर्णपदक देखील जिंकली असती.”
ठाणे जिल्ह्याच्या इतर खेळाडूंनीही केलेली उज्वल कामगिरी:
उदयन घोरपडे – सुवर्णपदक
राजवीर देशमुख – सुवर्णपदक
आयुषी केंद्रे – रौप्यपदक
स्वरा गायकवाड – रौप्यपदक
या सर्व खेळाडूंनी ठाणे जिल्ह्याचा नावलौकिक राज्यस्तरावर वाढवला आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो.या यशाबद्दल कुराश असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष मा. श्री. अंकुश नागर सर व महासचिव श्री. शिवाजी साळुंखे सर यांनी सर्व खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.