पोलीस ठाणे संगमेश्वरच्या सुरक्षा कमिटी सदस्या यांनी केला इचलकरंजी येथे थाळीपट्टू श्रावणी शेखर हळदकर हिचा सत्कार ….

Spread the love

संगमेश्वर : दिनेश अंब्रे / नावडी- संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या सुरक्षा कमिटी सदस्या आणि पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका  सौ. अर्चिता राहुल कोकाटे यांनी थाळी फेकपट्टू कु. श्रावणी शेखर हळदकर हिचा इचलकरंजी येथे जाऊन सत्कार केला.
       

कु.श्रावणी शेखर हळदकर ही डी के टी इंटरनॅशनल स्कूल,  तारदाळ तालुका. हातकलंगले पो. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे  इयत्ता सातवी मध्ये शिकत असून तिने लहानपणापासूनच थाळीफेक या खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. राष्ट्रीय स्तरावरील वाराणसी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये दिनांक 12 ऑक्टोबर ला ॲथलेटिक मीट अंतर्गत ( सीबीएसई ) 2025 – 26 मध्ये विशेष प्राविण्य मिळवले.


      

तसेच क्लस्टर नऊ स्टेट अंतर्गत स्पर्धा 9 ऑक्टोबर रोजी झाली त्यामध्ये तिचा प्रथम क्रमांक आला. तिने 23 मीटर लांब थाळी फेकून हे प्राविण्य मिळविले.
    

कोल्हापूर जिल्हा आंतर  शालेय स्पर्धेमध्ये 27.83 मीटर लांब थाळी फेकून तिने प्रथम क्रमांक मिळवला त्यासाठी डेरवण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिची कोल्हापूर जिल्ह्यातून निवड झाली.
        

ऑक्टोबर मध्ये झालेल्या डेरवण येथील विभागीय स्पर्धेमध्ये तिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला व पुढील स्पर्धेसाठी ती पात्र ठरली.
       

या सर्वासाठी तिचे शाळेचे सर श्री. ज्ञानेश्वर भगतसर, श्री बजरंग बली थोरवत सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शिक्षकांची मेहनत, आईचे कष्ट आणि तिची स्वतःची जिद्द या जोरावर तिने हे प्राविण्य मिळवले आहे.
    

कुमारी श्रावणी हिचे पितृछत्र वयाच्या सहाव्या वर्षीच हरपले. त्यामागे तिची आई श्रीमती शामल शेखर हळदकर यांनी आपल्या या मुलीचे खेळामधील स्वप्न पुरे केले.
     

श्रावणीच्या आईने आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या दोन्ही मुलांना स्वकष्टाने  शिकवून त्यांची सगळी  स्वप्न पुरी करण्यासाठी  अपार कष्ट आणि मेहनत  घेतली आहे.
     

श्रावणी ही  अभ्यासात हुशार तसेच स्वभाव मनमिळाऊ, प्रेमळ, प्रामाणिक आणि खेळामध्ये खूप मेहनत घेणारी मुलगी आहे.
     

आणि म्हणूनच सौ कोकाटे मॅडम आणि त्यांच्यासोबत सौ आर्या मयेकर, सौ सविता हळदकर यांनी इचलकरंजी ला तिच्या घरी जाऊन श्रावणीचे खूप कौतुक केले व तिच्या भावी यशासाठी,  उज्वल भविष्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. सोबत तिची आई  श्रीमती शामल यांचेही विशेष अभिनंदन केले. कुमारी श्रावणी ही संगमेश्वर येथील रहिवाशी श्री. सयाजी हळदकर यांची सख्खी पुतणी आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page