
सुशांत पाटील / दिवा /ठाणे- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. “चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या. उर्वरित वादाचे मुद्दे टाळा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतरच
महापालिका निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत असे सध्या तरी दिसते. आता प्रत्येकजण आपापल्यापरीने सगळ्यांचे लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतातच. यामध्ये कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, नेते. कार्यकर्तेही मागे नाहीत. असाच काही प्रकार दिव्यात काल घडला. दिवा शिवसेना शिवसेनेचे दिवा शहर संघटन रोहिदास मुंडे यांनी काल भाजपला डिवचण्याचा प्रकार केला.
मुंडे यांनी भाजपचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांना टार्गेट केलं. वाघुले यांना मुंडे यांनी ‘अकार्यक्षम असल्यामुळेच त्यांना या पदावरुन हटवलं असावा सणसणीत
टोला लगावला. भाजप पक्ष ठाण्यात संपवण्याचे काम वाघुले यांनी अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर केल्याचा आरोप रोहिदास मुंडे भाजप पक्ष सोडल्यानंतर केला होता. पक्षातील कार्यक्षम नेतुत्व बाजूला करून शिंदे गटाच्या तालावर वाघुले चालत असल्याचा आरोपही त्यावेळी रोहिदास मुंडे यांनी केला होता. या संदर्भात दिव्यातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संताप दिसून आला.
पूर्वी रोहीदास मुंडे हे भाजपामध्ये होते. तेव्हा त्यांना काही दिसलं नाही.आताच का मुंडेंना हे बोलण्याचं सुचलं. संजय वाघुले यांना टार्गेट करण्याची गरज काय … की रोहिदासमुंडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी दुसरा गोळी चालवत तर नाही ना… अशी दबक्या आवाजात चर्चा येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मुंडेसाहेब भाजपामध्ये दर 3 वर्षांनी जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक होते त्यामुळे प्रत्येक निष्ठावंताची पक्ष श्रेष्ठी दखल घेतात तूम्ही फक्त दुसऱ्यावर गरळ ओकून तोंड सुख घेता. तुम्हाला भाजपाने दिवा मंडळ अध्यक्ष देऊन पक्ष वाढवण्याची संधी दिली होती तेव्हा तूम्ही काय दिवे लावलेत. आता फक्त उद्धवरावांना पक्ष प्रमुख पदावरून हटवून संजय राऊत यांना पक्ष प्रमुख बनवण्याचा सल्ला द्या मग तुम्ही मोक्षास पात्र व्हाल. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी तुमची बिकट अवस्था झाली आहे.
तुम्हाला दिवा मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती ती तुम्हाला पेलता नाही आली. हेच पद तुमच्या आयुष्यातील मोठी जबाबदारी ठरेल असं वाटत.यापुढे नगरसेवक सुद्धा व्हाल काय नाही याचीच शंका आहे. पाच टर्म च्या नगरसेवक राहिलेल्या वाघुले साहेबांना पक्ष कसा वाढवावा हे सांगता.’हे तर स्वतःनागड राहुन दुसऱ्याचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करण्यासारखं झालं.
-सचिन भोईर, अध्यक्ष, दिवा शिळ मंडळ भाजप