
वाशिम- समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात कारचा भीषण घडला आहे. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघातग्रस्त कार मुंबईहून नागपूरकडे जात होती. कारला समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील डोनदच्या लोकेशन १७४ वर भीषण अपघात झाला. या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातामध्ये कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोकेशन समृद्धी महामार्ग १०८ पायलट विधाता चव्हाण, डॉ. शेख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.