लोणावळा : पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची भीषण धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. ही कार मुंबईवरून पुण्याकडे जात होती. उर्से टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अर्धी कार ट्रकखाली गेली आहे.
आज सकाळी ७.४५ मिनिटांच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. ट्रकचा बिघाड झाल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. त्याच वेळी भरधाव वेगाने कार आली आणि तिने थेट त्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांककडून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू असून कार मधील.सर्वजण कुठले होते याचा तपास करण्याचे काम सुरू आहे.