सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने फक्त दोन धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडूवर तीन धावा काढत संघाचा शानदार विजय निश्चित केला.

*दुबई :* आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य राहिली आहे. सुपर फोर फेरीतील शेवटचा सामना शुक्रवारी (26 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियानं सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारिक 20 षटकात 202 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेनंही दमदार फलंदाजी करत 20 षटकात 202 धावांपर्यंत मजल मारली. अशा स्थितीत सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये काय झालं?…
अर्शदीप सिंगनं टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेनं 2 धावा केल्या, म्हणजेच भारताला जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर भारतानं पहिल्याच चेंडूवर 3 धावा करून सामना खिशात घातला. वानिंदू हसरंगाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवनं तीन धावा केल्या. दरम्यान, टीम इंडियानं आधीच फायनल गाठली आहे. जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान रविवारी (28 सप्टेंबर) भिडतील.
श्रीलंकेचा डाव : भारताच्या 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. कुसल मेंडिस स्वस्तात बाद झाला. पण यानंतर सलामीवीर पथुम निस्संका आणि कुसल परेरा क्रीजवर टिकून राहिले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. कुसल परेरानं 32 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह 58 धावा चोपल्या. वरुण चक्रवर्तीनं कुसल परेराला बाद करून ही भागीदारी तोडली. त्यानंतर भारतानं चरिथ असलंका आणि कामिंदू मेंडिस यांचे झटपट बळी घेतले. मात्र निस्संका याच्या शतकानं सामना रोमहर्षक स्थितीत पोहोचवला. पथुम निस्सांकानं 58 चेंडूत 107 धावांचा पाऊस पाडला, ज्यात 7 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
श्रीलंकेला शेवटच्या षटकात 12 धावा करता आल्या नाहीत…
श्रीलंकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 12 धावांची गरज होती. हर्षित राणानं टाकलेल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाथुम निसांका बाद झाला. पुढच्या चेंडूवर जानिथ लियानागेनं दोन धावा घेतल्या आणि तिसऱ्या चेंडूवर बायची एक धाव घेतली. दासुन शनाकानं चौथ्या चेंडूवर दोन धावा वसूल केल्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला. शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेला तीन धावा हव्या होत्या, परंतु शनाकाला फक्त दोन धावा करता आल्या, ज्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
अभिषेक शर्माचं वादळी अर्धशतक …
तत्पूर्वी, श्रीलंकेनं टॉस जिंकून भारतासाठी आमंत्रित केलं. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल स्वस्तात बाद झाला. यानंतर अभिषेकनं 22 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं. चालू आशिया कपमध्ये अभिषेक शर्माचं हे सलग तिसरं अर्धशतक होतं. अभिषेकनं 31 चेंडूत 8 चौकार आणि दोन षटकार ठोकत 61 धावा ठोकल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनं पुन्हा निराशा केली आणि फक्त 12 धावा केल्या. अभिषेक आणि सूर्यकुमार यादवने दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली.
तिलक-संजूची निर्णायक भागिदारी …
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सूत्रं हाती घेतली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसननं 23 चेंडूत 39 धावा केल्या, त्यात तीन गगनचुंबी षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. संजू बाद झाल्यानंतर भारतानं हार्दिक पंड्याला स्वस्तात गमावलं. त्यानंतर, तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी नाबाद 40 धावांची भागीदारी करून भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. तिलक वर्मानं 34 चेंडूत 4 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 49 धावा केल्या. अक्षर पटेलनंही नाबाद 21 धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेकडून चारिथ असलंका, दुष्मंथा चामीरा, दासुन शनाका, महेश थीकशन आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

